नवी मुंबई 

चीनमधून आलेला कोरोना व्हायरस अनेक देशामध्ये पोहचला असून केरळ व अहमदाबाद येथे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतामध्ये रुग्ण मिळाल्यामुळे या व्हायरस बाबत अनेकांच्या मनात चिंता असून सोशल माध्यमांच्या मार्फ़त पसरल्या जाणार्‍या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे , याच परिस्थितेचे भान ठेवून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर मध्ये डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत नवी मुंबईतील 40 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत इन्फेकशन कंट्रोल साहाय्यक डॉ. अनीला प्रबिल, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  डॉ. आर सरस्वती जयंती व  डॉ. शालिनी गोरे, तेरणा हॉस्पिटलच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. दीपिका उगाडे यांनी मार्गदर्शन केले,  प्राध्यापिका डॉ मिताली नाईक यांनी महाराष्ट्र सरकारने या व्हायरसबाबत नियोजित केलेल्या सुविधांची माहिती दिली.

नागरिकांनी प्रतिबंधक तत्त्वांचे पालन केले तर सद्यःस्थितीत हा आजार भारतात वेगाने पसरण्याची शक्यता नाही; दुर्दैवाने काही बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य उपचार केले तर ते लगेच बरे होतात त्यामुळे मृत्युदर आटोक्यात राहील असे मत या कार्यशाळेत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केले.

 

अवश्य वाचा