हमरापूर 

समता परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर पेण तालुक्यांतील दादर गावचे हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत पेण मधील हेमंत अर्जुन पाटील यांची उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला समता परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ना.छगन भुजबळ, यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे समता परिषदेचे समता सैनिक उपस्थीतीत होते या बैठकीत समता परिषदेच्या विस्तार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले      हेमंत पाटील यांची रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. 

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार