पनवेल  

कर्नाळा चेरिटेबल ट्रस्ट संचलित लेट एम. एस. तांडेल इंटरनॅशनल स्कूल कासारभट मधील विद्यार्थ्यांनी 19 व्या रायगड जिल्हास्तरीय तायक्वॉडो स्पर्धेत यश संपादित केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकांची कमाईसह रौप्य व कांस्य पदकेही पटकाविली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ.विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

यावेळी पार पडलेल्या 19 व्या रायगड जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये अन्वेशा म्हात्रे व समिधा म्हात्रे या विद्यार्थिनींनी सुवर्ण पदके कमविली. यावेळी या दोन्ही विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.  तसेच यावेळी आर्य ठाकूर,  असद दळवी, आस्था भगत, पृथ्वीराज पाटील यांनी रौप्य तर अक्षरा म्हात्रे हिने कांस्य पदक पटकाविले. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार विवेकानंद पाटील, शाळा समितीचे चेअरमन अभिजित पाटील, शाळा समिती सदस्य तसेच विद्यालयांच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षक सुभाष पाटील आणि सोनू वडगेरी यांचेही विचेसह अभिनंदन करण्यात आले. 

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार