मुंबई 

रोहतक - हरयाणा येथे होणार्‍या 46व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे दोन्ही संघ रवाना झाले. राज्य कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आस्वाद पाटील हे देखील स्पर्धकांना शुभेच्छा देऊन गेले. त्यांना शुभेछा देण्याकरिता सायं. 4-00वा. छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, ठाणे जिल्हा कबड्डी असो. चे कार्याध्यक्ष मनोज पाटील, माजी सहकार्यवाह मिनानाथ धानजी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तदप्रसंगी ठाणे जिल्हा कबड्डी असो. चे कार्यवाह मालोजी भोसले, राज्य संघटनेच्या प्रसिद्धी समितीचे सचिव शशिकांत राऊत, कार्यालयीन सचिव केशव सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते.  महाराष्ट्राचे संघ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून पंजाब मेलने स्पर्धेकरिता रवाना झाले. 

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार