दिनांक 14 फेब्रुवारी 2020

1378 - विजयनगरचा हिंदू साम्राज्याचे संस्थापक हरिहर व बुक्क या बंधूंपैकी बुक्कराव यांचे निधन.

1483 - हिंदुस्थानात मोगल साम्राज्याचा संस्थापक जाहिरुद्दीन महमंद बाबर यांचा मध्य आशियात फर्गन प्रांतात जन्म.

1869 - विद्युतभारित कनांवर संशोधन करणार्‍या चार्ल्स विलन्सचा जन्म.

1916 - मराठीत सिद्धहस्त कवियित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.

 1925 - स्वातंत्र्यसेनानी, मुरुड- जंजिरा संस्थानाचे मुक्तादाते, केंद्रीय मंत्री आणि वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांचा जन्म.

जाहिरुद्दीन महंमद बाबर याचा जन्म शुक्रवार 14 फेब्रुवारी, 1483 रोजी मध्य आशियातील फरगाणा प्रांताची राजधानी आजिजान येथे झाला. पित्याच्या मृत्युमुळे अवघ्या 11 व्या वर्षी फरगण्याचे राज्य तो सांभाळत होता. ज्या मध्य आशियात बाबरचे राज्य होते. तेथे कोण कुणाचा कधी शत्रू तर कधी मित्र होईल याचा थांगपत्ता लागत नसे. बाबर तर लहानपणीच गादीवर आला. तेव्हा त्याला शत्रू फार, शिवाय तोही महत्त्वाकांक्षी समरकंद जिंकणे हे बाबरचे स्वप्न. तीन वेळा त्याने ते जिंकले आणि हरलेही. शेवटी समरकेंद जिंकण्याच्या नादात त्याने आपलेस्वतःचे फरगाणा प्रांताचे राज्यही गमावले. नशिबी वनवास आला. धीर खचला, ‘मी सारखा रडत होतो.’ असे स्वतः बाबरनेच म्हटले. भटकंती करत असताना त्याची नजर काबूलवर वळली. त्याने काबूल कंदहार जिंकले तेव्हा त्याला हिंदुस्थानचे वेड लागले.

हिंदुस्थानात या सुमारास दिल्लीच्या सुलतानपदी दुबळा पण क्रूर इब्राहिम लोदी राज्य करत होता. त्याच्या जुलमी राजवटीला कंटाळून त्याचा काका आलमखान, पंजाबचा राज्यपाल दौलतखान लोदी आणि चितोडचा राणारिंग यांनीच बाबरला हिंदुस्थानावर स्वारी करून लोदीचे पानिपत्य करण्याचे आमंत्रण दिले. त्याला मान देऊन बाबर हिंदुस्थानात आला. 21 एप्रिल,1526 रोजी हीच ती पानिपतची पहिली लढाई बाबरने इब्राहिम लोदीच्या विरोधात लढली. तोफेचा पहिल्यांदा उपयोग बाबरने हिंदुस्थानात केला. त्याच्या जिवावर त्याने लोदीचा पराभव करुन सुलतानशाही बुडवून दिल्लीची गादी मिळवली आणि त्याने हिंदुस्थानात धार्मिक होण्याचा निर्णय घेतला. तथापि त्याला अनेक संकटे होती. चितोडचा राणासिंग आता त्याच्या विरोधात उभा होता. तेव्हा बाबरने भर रणांगणात आपल्या सैनिकांसमोर ‘मद्याच्या बाटल्या फोडून मी आता कुराणाप्रमाणे धर्माचे आचरण करीन. है युद्ध युद्ध नसून मुसलमान धर्मासाठी जिहाद’ आहे. तेव्हा ‘इस्लामच्या रक्षणासाठी लढा आणि काफरांना मारा.’ ह्या त्याच्या तेजस्वी भाषणाने मुसलमानांमध्ये चेव आला. त्यामुळे बलाढ्य अशा राणासिंगचा त्याने पराभव केला. त्यानंतर प्रबळ असा राजपूत शत्रू त्याला न राहिल्याने तो आता खर्‍या अर्थाने हिंदुस्थानचा स्वामी झाला. सर्वच इतिहासकारांनी बावरच्या कर्तृत्वाची स्तुती केली आहे. आदर्श भक्ती, सुसंस्कृत विद्वान, शौर्यशाली योद्धा, सेनापती, थोर विजेता, कुशल प्रशासक, महान राजनीतीज्ज्ञ अशी बिरुदावली त्याला चिकटवून त्याचा गौरव केला. स्वतः बाबरने आपले ‘तझूक-इ-बाबरी’ नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्यात त्याने आपल्या गुणदोषांचे वर्णन केले आहे. हिंदुस्थानविषयीचे त्याचे मत जरा चमत्कारिकच वाटते. तो म्हणतो की, येथील लोक दिसायला चांगले नाहीत, स्वभावात गोडवा नाही, चांगली घरे, थंडगार पाणी, रुचकर फळे, मांस येथे मिळतच नाही. साधा मेणबत्तीचा तुकडा बघायला मिळत नाही. फक्त सोने चांदी मुबलक आहे. कदाचित त्याला हिंदुस्थानच्या अंतःस्थितीची फारशी माहिती नसल्याने बहुधा त्याने भारताचे असे वर्णन केले आहे.

त्याच्या मृत्यूविषयीची विलक्षण कहाणी इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याचा लाडका मुलगा हुमायून गादीचा भावी वारस एकाएकी खूप आजारी पडला. औषधांचा गुण येत नाही हे पाहून बाबर अत्यंतदुःखी झाला तेव्हा त्याने शेवटचा उपचार केला, तो म्हणजे आपले आयुष्य हुमायूनला देण्याचा. हुमायूनच्या बिछान्याजवळ अल्लाची प्रार्थना करत तो तीन वेळा आपल्या मुलाच्या बिछान्याभोवती फिरला आणि ‘फते, फते’ म्हणून ओरडला. तेव्हापासून हुमायूनला आराम पडून बाबरची तब्बेत मात्र खालावत चालली होती. अखेर 26 डिसेंबर, 1530 रोजी त्याचा अंत झाला. बाबर काय आणि लोदी काय सुलतान आणि मोंगल दोघेही मुसलमानच. रणसिंगचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी राजपुतांची शिरे कापून त्यांच्या मुंडक्यांचा मनोरा उभा केला आणि बाबरने स्वतःला गाझी म्हणजे धर्मयोद्धा, धर्माच्या रक्षणासाठी काफरांना ठार मारणारा, अशी पदवी घेतली.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार