पनवेल 

बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेक याद्वारे कंपनीच्या खात्यातून 4 कोटी 10 लाख रुपये फसवणूक करणार्या 7 जणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

आयसीआयसीआय बँक शााखा पनवेल येथे एका अनोळखी इसमाने हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रा.लि. या कंपनीचे बनावट लेटरहेड बनवून त्यावर कंपनीचा रबरी शिक्का मारुन खोट्या सह्या करून नमूद कंपनीच्या नावे बँकेत असलेल्या खात्यांचा मोबाईल क्रमांक बदली करण्याासाठी सदरचे लेटरहेड बँकेत देवून बनावट चेकद्वारे नमूद कंपनीच्या खात्यात असलेली 4 कोटी 10 लाख रुपये किंमतीची रक्कम आर.के.एंटरप्रायझेस यांचे इंड्सइंड बँकेतील खात्यात वर्ग करून बँकेची एकूण 4 कोटी 10 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात येताच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सह.पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हेगारांचा शोध वपोनि अजयकुमार लांडगे यांच्यासह सहा.पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, ईशान खरोटे, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस नाईक पंकज पवार, दिनेश जोशी, अजय कदम, राहूल साळुंखे, केशव शिंदे हे करीत असताना या गुन्ह्यामध्ये सदर बँकेतील एक कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेेवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने बँकेतील कंपनीच्या खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती मित्राला दिली व सदर मित्राने ती माहिती आराफत हनिफ शेख (33, धंदा वकील) याला दिली व त्याने ही माहिती रामकिशन लुलारकनाथ पांडे (51, धंदा एक्सपोर्ट), अमिताभ ओरोविदो मित्रा (61 धंदा कन्सलन्टंट), विनोद मधुकर भोसले (44 धंदा कंन्स्ट्रक्शन), जावेद हबीब अहेमद कुरेशी (55), श्रीजील मोहनन कुरपम्बील (39 धंदा व्यवसाय) व आयसीआयसीआय बँक जुनी पनवेल शाखा सेल्स मॅनेजर मुकेश लक्ष्मणप्रसाद गुप्ता (45) आदींनी संगनमत करून सदर रक्कम ट्रान्सफर करीत असताना त्याांना पकडण्यात आले आहे. यातील एक आरोपी अजून फरार असून त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान हे सर्व आरोपी उच्च शिक्षित असून काही पेशाने वकील, बँकेत मॅनेजर, व्यावसायिक तर एक आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेला आहे. यापूर्वी सुद्धा आराफत हनिफ शेख याने वाशी येथील बँकेमध्ये अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा केला होता व तो सफल झाला नाही.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार