दापोली

पंचायत समिती दापोलीच्या वतीने तालुक्यातील कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविणेसाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सभापती रऊफ हजवानी, माजी सभापती राजेश गुजर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.  महिला-पुरुष कर्मचारी यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांसाठी व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ तसेच पुरुषांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दीबळ आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार