दापोली

 इन्स्टिट्युट ऑफ न्यू मीडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च पुणे, ज्ञानदीप दापोली, ए.जी. हायस्कूल दापोली, रामराजे महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 22 व रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी स.9 ते 1 व दु. 4 ते 7 यावेळेत राधाकृष्ण मंदिर दापोली येथे छोटा शास्त्रज्ञ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान सहज समजावे आणि त्याची गोडी लागावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. इ. 5 वी ते 9 वी मध्ये शिकणार्‍या 10 वर्षावरील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार असून प्रयोगासाठी लागणारी सर्व सामुग्री आयोजकांमार्फत देण्यात येणार आहे. या साहित्याचे मूल्य एक हजार असून ते ज्ञानदीप दापोली येथे जमा करुन प्रवेश घ्यायचा आहे. सहभागी विद्यार्थ्यांना छोटा शास्त्रज्ञ सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. कार्यशाळेत विशेष यश दाखवणार्‍या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन या कार्यशाळेनंतर दि. 28 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.  कार्यशाळेच्या प्रवेशासाठी निलेश कदम 7498409848 व अधिक माहितीसाठी श्रीकांत गद्रे 9422000101 यांच्याशी संपर्क साधावा.

अवश्य वाचा