दापोली

  शिवसेना दापोली विधानसभा मतदार संघ, शिवतेज आरोग्य सेवा संस्था जामगे, उपजिल्हा रुग्णाला दापोली व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आ. योगेश  कदम यांच्या वाढदिवसानिमित्त नामांकित वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी पालगड, हर्णै, जालगांव विभाग व दापोली शहर आणि मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी केळशी, असोंड व बुरोंडी विभागासाठी स.10 ते सायं. 5 या वेळेत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीच्या सर विश्‍वेश्‍वरैया सभागृहामध्ये सदर शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीरामध्ये रक्त व लघवी तपासणी, अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, सर्वसाधारण आजार, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन, रक्तदाब व डायबिटीस तपासणी करण्यात येणार आहेत. सदर महाआरोग्य शिबीराचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना दापोली-खेड- मंडणगड तालुक्यातील ग्रामीण व मुंबईतील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आले आहे.

अवश्य वाचा