दापोली

 वणंद येथे उभारण्यात आलेल्या माता रमाई स्मारक सभागृहाचा लोकार्पण सोहळा जोशपूर्ण वातावरणात नुकताच उत्साहात पार पडला. आमदार आदर्श ग्राम विकास योजने अंतर्गत आमदार  भाई गिरकर यांनी सदर गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक घेतलेल्या मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे माहेर दापोली तालुक्यातील वणंद येथे उभारण्यात आलेल्या मातोश्री रमाई स्मारक सभागृह (विश्रांतीगृह) व स्वच्छतागृहाचा लोकार्पण समारंभ मातोश्री रमाईच्या जन्म जयंतीच्या पूर्व संध्येला भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यामाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय गिरकर व विशेष उपस्थिती सरपंच सुवर्णा खळे, उपसरपंच रोशन मंडपे व सर्व ग्राम पंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ, वणंद बौध्दवाडी येथील ग्रामस्थ, यासाठी विशेष मेहनत घेणारे तत्कालिन उपअभियंता दिलीप जालगावकर, आर्किटेक्ट ऐश्‍वर्या जालगावकर, वणंद प्रकल्प समन्वयक चंद्रमणी गमरे यांच्यासह राज्यभरातून आलेले बौध्द अनुयायी उपस्थित होते. 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार