दापोली

 दापोली नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती व दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दापोलीतील बचतगटातील महिलांना कॅन्सरमुक्तीवर नुकतेच व्याख्यान देण्यात आले.

या व्याख्यानासाठी दापोलीतील 60 ते 70 महिलांनी हजेरी लावली होती. या उपस्थित महिलांना मुंबई येथील टेक्नॉड्रिम िाएशन प्रा.लि.चे सीईओ विश्‍वजीत मुनेश्‍वर यांनी मागदर्शन केले. तसेच याच कार्यामात व्यवसायाविषयी बचतगटांना माहिती दिली. महिला व बालकल्याण सभापती डॉ. शबनम मुकादम यांनी देखील मार्गदर्शन केले.

या कार्यामाला टेक्नॉड्रिम िाएशन प्रा. लि.च्या साहिली घडसे, दापोली नगपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. शबनम मुकादम, नगरसेविका रझिया रखांगे, परवीन रखांगे, जया साळवी, नम्रता शिगवण, उल्का जाधव, कृपा घाग, दापोली नगरपंचायतीच्या समुदय संघटिका अनामिका साबळे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार