दापोली

 श्री गजानन महाराज यांचा 142 वा प्रकटदिन सोहळा शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज समाज मंदिर गिम्हवणे येथे साजरा करण्यात येणार आहे.   यानिमित्त मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी स.10 ते 12 श्रींच्या मूर्तीवर ऊसाच्या रसाचा अभिषेक, सायं. 4 ते 5 संगीत दुर्गा भजनी मंडळ दापोली यांचे भजन, सायं. 7 ते 8 वा. लक्ष्मी-नारायण पुरुष भजनी मंडळ जालगांव बुवा प्रल्हाद मालशे यांचे भजन. बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी स.10 ते 12 श्रींच्या मूर्तीवर नारळपाणी अभिषेक, सायं.4 ते 6 विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सायं. 7 ते 8 वा. गणेश भजनी मंडळ ब्राह्मणवाडी बुवा सतिश जोशी यांचे भजन, गुरुवार दि. 13 फेब्रुवारी रोजी स.9 ते 11 श्रींच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक, स.11 श्री सत्यगजानन महापूजा, सायं. 4 ते 5 श्री लक्ष्मी-नारायण महिला भजन मंडळ जालगांव यांचे भजन, सायं. 6 वा. आरती, सायं. 6.30 ते 7.30 दत्त भजनी मंडळ जालगांव बुवा मंदार जाधव याचे भजन संपन्न झाले.

तसेच शुक्रवार दि. 14 फेबु्रवारी रोजी स.5 ते 7 काकड आरती, पंचामृती पूजा, अभिषेक, स.7 ते 8 नामजप, स.8 ते 9 अक्षत अभिषेक, स.9 ते 4 श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायं. 4 ते 6 सौ.प्रियांका मालशे यांचे प्रवचन, सायं.6 नंतर आरती, सायं.7 ते 8 गुरुवर्य ह.भ.प. पांडुरंगबुवा रेवाळे निगडे यांचे वारकरी किर्तन. शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी स.5 ते 10 काकड आरती, अभिषेक व लघुरुद्र, पालखी पादुका प्राणप्रतिष्ठापना, स.10 ते 12.30 ह.भ.प.प्रा.अशोक देशमुख जालगाव यांचे सुश्राव्य किर्तन, दु.12.30 पासून महाप्रसाद, दु.2 ते 4 संगीत सेवा, सायं. 5 ते 8.30 श्रींची पालखी मिरवणूक ओंम आदिनाथ वारकरी सांप्रादाय मंडळ, निगडे सहभाग गुरुवर्य ह.भ.प. श्री.पांडुरंगबुवा रेवाळे, सायं.5 ते 5.45 मंत्रजागर, सायं.6 त े7 श्री माऊली भजनी मंडळ, ब्राह्मणवाडी श्री.रमेश कडू यांचे भजन, सायं.7 ते 8 श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ गिम्हवणे सुतारवाडी श्री.सुशांत देवघरकर यांचे भजन, रात्रौ 9 ते 10 हरिपाठ, रात्रौ 10 वा. प्रकटदिन समारोप आरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दि. 15 फेब्रुवारी प्रकटदिन रोजी दिवसभर एस.टी.स्थानक दापोली व जालगाव येथून श्री गजानन महाराज समाज मंदिर पर्यंत एस.टी.बसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गजानन महाराज भक्त मंडळ गिम्हवणेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी केले आहे.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार