वृक्षतोड करणार्‍या अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील तोंडरे गावातील एका शेतकर्‍याच्या जमिनीवरील वृक्षतोड करणार्‍या अज्ञात इसमांविरोधात महापालिकेच्यावतीने तळोजा पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील तोंडरे गावातील एका शेतकर्‍याच्या जमिनीवरील आंबा, केळी, शेवगा अशी 12 झाडे अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी तोडली होती. याबाबतची तक्रार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार या गुन्ह्यातील अज्ञात इसमांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

पनवेल महापालिका हद्दीतील झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. संबंधित ठिकाणी तोडलेल्या झाडांपैकी काही झाडे ही भाजीवर्गीय असून, त्याविरोधात तक्रार करता येत नाही, त्यामुळे तीन आंब्यांच्या झाडांच्या फाद्यांची छाटणी करून झाडास इजा व नुकसान पोहोचविल्याबद्दल अज्ञांताविरोधात तळोजा पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version