मुलांच्या संघात मुलीची दमदार खेळी

तनिष्काने ठोकल्या 75 धाव; करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाचा विजय


| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघांनी अलिबागच्या संघावर विजय मिळवला आहे. या मुलांच्या संघात तनिष्का वार्गेने दमदार खेळी करीत मुली मुलांपेक्षा कमी नाहीत हे दाखवून दिले. सामन्याच्या सुरवातीला रायगड प्रीमियर लिग कमिटीचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. अलिबाग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. 40 षटकांत 198 धावांची नोंद धावफलकावर केली. मधल्या फळीत तनिष्का वार्गे हिने दमदार फलंदाजी करत 88 चेंडूंचा सामना करून 14 चौकरांच्या सहाय्याने 75 धावा ठोकल्या. मुलांच्या संघात एका मुलीने दमदार फलंदाजी केल्याने प्रेक्षकांनी तनिष्का वार्गेचे कौतुक केले. तिला दुसऱ्या बाजूने सय्यद अहेमद यांनी 38, अर्णव शिंदे यांनी 16 धावा केल्या.

करण क्रिकेट अकॅडमी कडून पियुष दांडेकरने 4 व वेदांत शिंदे यांनी 3 फलंदाजांना बाद केले.प्रतिउत्तर देतांना करण क्रिकेट अकॅडमी संघांनी कडवी झुंज देत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेहाला अगदी शेवच्या चेंडूवर एक धाव काढत सामना जिंकला, पियुष दांडेकर यांनी 48,आर्यन पांडे 28,वेदांत शिंदे 21,लिला संघवी यांनी 17 धावांचे योगदान दिले. अलिबाग संघाकडून ईशान काठे व ओम कवळे यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. अष्टपैलू खेळी करणाऱ्या पियुष दांडेकरला सामनावीर, दामदार फलंदाजी करणाऱ्या तनिष्का वार्गे हिला स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, सय्यद अहमद इमॅर्जिंग खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्णव पाटील, रिषभ बिश्वास यांना रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण विभागाचे अधिकारी सुनिल भोपाळे, अलिबाग इंडस्ट्रियल हायस्कूलचे प्राध्यापक नितीन वार्गे, महाराष्ट्र महसूल रायगड विभागाचे कर्मचारी नागेश भगत, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे समन्वयक संदिप वार्गे झुंझारचे सचिव किशोर तावडे, अजय टेमकर, पंच अभिजित वाडकर, ॲड. पंकज पंडित, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version