मोतेंसारखे व्यक्तिमत्व समाजासाठी आदर्शवत – डावखरे

। राजापूर । प्रतिनिधी |
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी संपूर्ण जीवन दिलेल्या माजी आमदार रामनाथ मोतेंसारखे व्यक्तिमत्व समाजासाठी आदर्शवत आहे. कोकणातील शिक्षकांवर मोते सरांच्या कार्याचा उमटेला ठसा कायम राहील, असे उद्गार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी येथे काढले.
यावेळी शिक्षण क्रांती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांच्या सेवापुर्तीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्मरणिकेचे प्रकाशन प्रा.अशोक बागवे सर यांच्या हस्ते करून जाधव यांच्या पत्नी सौ.शोभा जाधव यांच्यासह सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप धुमाळ, प्रा. अशोक बागवे, माजी आमदार बाळ माने मोते सरांच्या कन्या दिपाली माहे,सुधीर घागस, रमेश जाधव, प्रसाद पंगेरकर, हेमंत खेमानी, आनंद त्रिपाठी, राहुल सप्रे, प्रकाश कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर गोसावी, एस जी पाटील आदींसह शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

यावेळी शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अशोक बागवे,माजी आमदार बाळ माने इंदुमती मोते यांचेही यावेळी भाषणे झाली. सुत्रसंचालन उदय काबळे यांना केले तर आनंद त्रिपाठी यांनी आभार मानले.

Exit mobile version