| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
साल्वाडोर देशात एका फुटबॉल सामन्यात एक भयानक घटना घडल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरले होते. दरम्यान, सामना सुरू असताना मैदानात लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून, 500 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेमुळं साल्वाडोरमध्ये हाहाकार उडाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची ही घटना मोनूमेंटल स्टेडियममध्ये घडली. या स्टेडियममध्ये देशांतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एलियांचा क्लब आणि एफएएस क्लब यांच्यात हा सामना रंगला होता.
मात्र, मैदानात अचानक घावपळ उडाल्याने प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 100 लोकांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.