| अलिबाग | वार्ताहार |
जिल्ह्यातील 80 वर्षावरील जे कुटूंब निवृत्ती वेतनधारक रायगड कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांनी अतिरिक्त निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याकरिता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड व पॅनकार्डची आवश्यकता आहे. तरी जिल्ह्यातील 80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायांकित प्रत जिल्हा कोषागार कार्यालय किंवा नजिकच्या तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.