। म्हसळा । वार्ताहर ।
पुणे-दिघी या राष्ट्रीय महामार्गावर महेंद्र पिकअप आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. या अपघातात म्हसळ्यातील बेकरी व्यावसायिक डी.व्ही.शशीकुमार (दि. 31) हे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा.घडला. माणगाव-दिघी मार्गावर साईजवळ ही घटना घडली.
महिंद्रा पिकअप म्हसळयावरून माणगावकडे जात असता समोरून येणारा मोटारसायकलस्वार शशीकुमार हा जोरात येऊन आदळला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. अपघाताचे वृत्त कळताच डी.वाय.एस.पी प्रविण पाटील आणि पो.निरीक्षक राजेंद्र पाटील यानी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.