वाहतूक पोलिसाचे अपघाती निधन

| पनवेल | वार्ताहर |

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कळंबोली वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई अरुण शामराव कर्ले (मेजर) एक्स सर्विस मॅन, रा. आदई ,नवीन पनवेल यांचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

अरुण कर्ले हे साप्ताहिक सुट्टीवर असताना ते पत्नीसह कामानिमित्त मोटारसायकलीने टेंभोडे या ठिकाणी जात होते. दरम्यान, एका डंपरची त्यांच्या दुचाकीला ठोकर लागून अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाल्याने त्यांना एमजीएम हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेले आहे. याप्रकरणी डंपर चालकाला खांदेश्‍वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version