सिनर्जी व डॉ. लोकूर हॉस्पिटलचे एकत्रीकरण

। चिपळूण । वार्ताहर ।
मिरज येथील सुप्रसिद्ध सिनर्जी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप व सुनीता विराज लोकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात विख्यात जनरल सर्जन डॉ. विराज लोकूर यांची सिनर्जी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होत असल्याची घोषणा मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी केली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिरजेतील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. नाथानिएल ससे तसेच प्रमुख उपस्थितीममध्ये मेडिकल डायरेक्टर व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील, डॉ. रेणुका आरळी, डायरेक्टर बाळकृष्ण चव्हाण, हृदयरोगतज्ञ डॉ.संजीव वायदंडे, जनरल फिझिशिअन डॉ. रोहित चड्ढा, डॉ. स्वाती सोमासे, डॉ. राहुल सुर्वे, डॉ. योगेश येडगी, फुफुसरोग तज्ज्ञ डॉ. गौरव फळे, डॉ. अदिती फळे, जनरल सर्जन डॉ. सतोष राजपूत डॉ. आकाश शिंदे, भूलरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील, दंतचिकित्सक डॉ. प्रांजल वालझडे तसेच वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय स्टाफ नर्सिंग स्टाफ, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version