| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग बसस्थानकातुन बुधवारी (दि. 25) सकाळी सात वाजताच्या सुमार अलिबाग वरून सुटलेली अलिबाग ते पनवेल विनावाहक शिवसाई बसचा अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई- गोवा महामार्गावर पेण ते पनवेल दरम्यान जिते गावाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रकला पाठीमागून ठोकल्यामुळे भीषण अपघात झाला. या बसमध्ये एकूण 20 प्रवासी प्रवास करत होते, अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर बसचा दरवाजा उघडता येत नसल्याने सर्व प्रवाशांना ड्रायव्हरच्या केबिन मधून बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले.