| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
उच्च माध्यमिक परिक्षेत अलिबाग तालुक्याचा 91.41 लागला असून तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सेंट मेरी कॉन्व्हेंट उच्च्य माध्यमिक शाळेतील वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी भक्ती निवास ननावरे हिने अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यातून 92.67 टक्के गुण मिळवत सर्वप्रथम तर जिया विपुर जैन आणि राज संजय जैन यांनी प्रत्येकी 91.83 टक्के असे द्वितीय क्रमांकाचेगुण मिळवले आहेत. तसेच याच शाळेतील युग चेतन कोहली याने 91.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सेंट मेरी कॉन्व्हेंट उच्च्य माध्यमिक शाळेतील भक्ती निवास नणावरे हिला 92.67 तर विशेष प्राविण्य श्रेणीत वाणिज्य शाखेचे 19 तर विज्ञान शाखेचे 7 असे एकूण 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम वर्गातून वाणिज्य शाखेचे 8 तर विज्ञान शाखेचे 31 असे एकूण 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. द्वितीय वर्गातून वाणिज्य शाखेचे 3 तर विज्ञान शाखेचे 16 असे एकूण 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच विज्ञान शाखेतील सृष्टी प्रकाश पाटील हिने 86.50 टक्के तर शर्वी विजयकुमार पाटील हिने 81.50 तर अर्चित तुषार कोलटे याने 80.67 टक्के गुण मिळवले.
जेएसएम कॉलेजमधील कला शाखेची विद्यार्थीनी श्रेया स्वप्निल अधिकारी हिने 91.14 टक्के गुण संपादन केले असून सिया नविन पडवळ हिला 86.83 तर सानिया विजय म्हात्रे हि 77.83 टक्के गुण मिळवले आहेत. तसेच विज्ञान शाखेतील पुर्वा अजित ठाकूर 84.17 टक्के संस्कार संतोष राऊत 78.33 आणि आदित्य भारत कवळे याने 77 टक्क गुण मिळवत कॉलेजमधून विज्ञान शााखेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. आरसीएफ स्कूलचा एकुण निकाल 93.82 टक्के इतका लागाल असून स्कूलची विद्यार्थीनी मृणालिनी चंद्रशेखर साठये हिने 86.83 टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून निनाद नामेदव पाटील याने 84 टक्के तर भक्ती अनिल पाटील हिने 83.67 टक्के गुण संपादन करीत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.