| पनवेल | वार्ताहर |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये मिशन ऑल आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केल्याने अवैद्य धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
परीमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत व इतर सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात हद्दीमध्ये मिशन ऑल आऊट मोहीम राबवली. त्यामध्ये त्यांनी आझाद नगर झोपडपट्टी येथून राजू दास या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कडून जवळपास 1 किलो गांजा हस्तगत केला. त्याचप्रमाणे अमली पदार्थाचे सेवन करणार्या 8 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच करंजाडे येथून आरोपी आर्यन सैनी याला सरा हस्तगत केला. तसेच देशी विदेशी दारूचा मुद्देमाल 7 इसमांकडून हस्तगत केला आहे. यामुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.