खालापूर पोलिसांची कामगिरी
| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील वावोर्ले येथे जनावरांची कत्तल केल्याच्या आरोपावरुन खालापूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मोकळया जागेमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल झाल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचे तपासाकरीता चार तपास पथके तयार केली होती.
कुर्ला मुंबई येथून खबऱ्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार खालापूर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व एक आरोपी यास अटक केली. यामध्ये फरहान हनिफ बुबेरे, आसिफ अब्दुल कुरेशी, जाफर अन्वर शेख, अयाज उर्फ महाराज कामत्री,कलाम कुरेशी( रा. मुबा कौसा) असे आरोपी निष्पन्न झाले असुन त्या पैकी एका आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. तसेच दोन आरोपीना यांना पनवेल तालुका पोलीसांनी त्यांचेकडील गुन्ह्यात अटक केली आहे. उर्वरीत दोन आरोपींटा यांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करू असे पोलिस निरिक्षक बाळा कुंभार यांनी दिली.
तसेच सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीत यास अटक करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रतन बागुल, नितीन शेडगे, पोलीस नाईक रणजित खराडे, मनोज सिरतार, सचिन व्हसकोटी, पोलीस शिपाई सुहास काबुगडे, बबन घुले, यांनी पार पाडली असुन गुन्ह्याचा अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक युवराज सुर्यवंशी हे करीत आहेत.