काजल डान्स अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या काजल डान्स अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन (2023-24) शनिवार, दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत अशोकदादा साबळे विद्यालय, कचेरी रोड, माणगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या स्नेहसंमेलन कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन काजल डान्स अकॅडमीतर्फे काजल पाखुर्डे, कल्पना पाखुर्डे, अजित पाखुर्डे व पाखुर्डे कुटुंबीय व मित्र परिवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमास माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सामाजिक कार्यकर्ते संजयआण्णा साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेवक प्रशांत साबळे, नगरसेवक अजित तारळेकर, नगरसेविका शर्मिला सुर्वे, नगरसेविका रिया उभारे, रमेश मोरे, प्रसिद्ध उद्योजक रामनारायण मिश्रा, मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, खरवली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खडतर, भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, अँड. पुंडलिक मालोरे, डॉ. अजय मेथा, प्रसिद्ध उद्योजक विरेश येरुणकर, हिरु शिर्के, सुनील खराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे काजल डान्स अकॅडमीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून या स्नेहसंमेलनाच्या जोरदार तयारी अकॅडमीतर्फे करण्यात आली आहे.

Exit mobile version