| माणगाव | प्रतिनिधी |
निजामपूर विभागातील बोंडशेत येथील पत्रकार संतोष बबन गायकवाड व त्यांचे छोटे बंडू अँड. इंद्रजित बबन गायकवाड या गायकवाड बंधुंनी उद्योग क्षेत्रात धाडसी पाऊल टाकीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करीत विभागातील विळे-भागाड एमआयडीसीत स्नेहा इंटरप्राइसेस यांचे अँक्वासट पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर हा नवीन व्यवसाय सुरु केला आहे.
या व्यवसायाचे उद्घाटन आजी लक्ष्मीबाई धनाजी गायकवाड, बाबूशेठ खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबूशेठ पोळेकर, राजेश कदम, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, गायकवाड कुटुंबीय व विभागातील ग्रामस्थ उपस्तित होते. संतोष गायकवाड, अपेक्षा गायकवाड, अँड इंद्रजित गायकवाड, सुप्रिया गायकवाड व गायकवाड कुटुंबीयांनी स्वागत केले. उदघाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गायकवाड बंधू व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.