| पोलादपूर | प्रतिनिधी |
आ. भरत गोगावले यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यास सुरूवात केली असून कोंढवी गणाचे राष्ट्रवादी अध्यक्ष, युवक अध्यक्षांसह मोरगिरी दळवीवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेना प्रवेश आ.गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
या शिवसेना पक्षप्रवेश समारंभावेळी चंद्रकांत कळंबे, यशवंत कासार, सतीश शिंदे तसेच सुरेश मोरे, संदीप सकपाळ, विजयबुवा मोरे, सुरेशबुवा शिंदे, जगदीश महाडिक, मनोहर शिंदे, रामचंद्र ढवळे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी या पक्षप्रवेश उपस्थित होते.
कोंढवी गणाचे अध्यक्ष बारकू रामजी शिंदे, पोलादपूर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी प्रमोद प्रदीप शिंदे यांच्यासह दत्ताराम शिंदे, दिलीप शिंदे, विजय शिंदे, अक्षय शिंदे, कल्पेश शिंदे आणि हेमा शिंदे, प्रमिला शिंदे, ललिता शिंदे, जनाबाई शिंदे, वंदना शिंदे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.