| पनवेल | प्रतिनिधी |
भिंगारवाडी बस स्टॉपजवळ मुंबई येथे पुणे हायवेच्या बाजूला पाण्याच्या डबक्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत एक अनोळखी इसम आढळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत. या इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून, उंची पाच फूट पाच इंच आहे. त्याचा चेहरा गोल असून, दाढी, मिशा वाढलेल्या आहेत. अंगामध्ये फिकट हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातली आहे. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम यांच्याशी संपर्क साधावा.