प्रसाद सावंत यांना मारहाण करणारे मोकाटच

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत वादात हल्ला झालेले प्रसाद सावंत आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे हल्लेखोर अद्याप मोकाटच आहेत. त्याचवेळी हल्लेखोर यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली इर्तिका गाडीदेखील पोलिसांनी जप्त केलेली नाही. दरम्यान, जीवे ठार मारण्याचा गुन्ह्या दाखल असूनदेखील पोलीस सर्व संशयितांना ताब्यात घेत नसल्याने याप्रकरणी कर्जत पोलिसांचे पथक दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.

कर्जत पोलिसांनी याप्रकरणी केवळ पाच जणांना ताब्यात घेणे असून, त्यातील चार कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील तरुण असून, एक ठाणे जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, हल्लेखोर ज्या इर्तिका गाडीतून आले आणि पळून गेले ती गाडी कर्जत तालुक्यातील बेडसे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, फिर्यादी यांनी माहिती यांनी असतानादेखील कर्जत पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली नाही. या हल्ल्यात जखमी झालेले प्रसाद सावंत यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचवेळी त्यांच्या पायावरदेखील शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Exit mobile version