| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग वडखळ मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याचे नाव घेत नाही. शनिवारी देखील या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने तास अर्धा तास वाहनांना या कोंडीतून बाहेर पडता येत नव्हते. या वाहतूक कोंडीमुळे धरमतर पुलावर काही गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना देखील घडली.
सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरी काही प्रमाणात वाहनांचे मात्र नुकसान झाले. वाहतूक कोंडी सोडविण्यात वडखळ आणि पोयनाड या दोन्ही पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी अपयशी ठरल्याने त्यांचे नियोजन सपशेल फेल ठरल्याने वाहतूक कोंडीत अडकलेले वाहन चालक आणि प्रवासी संताप व्यक्त करत होते. या मार्गावर एकही वाहतूक पोलिस नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान वाहतूक पोलीस नसल्याने जेएसडब्ल्यू चे सिक्युरिटी गार्ड यांनी वाहतूक नियंत्रण करण्याचे काम केल्याने काही काळ का होईना दिलासा मिळाला.