पेण तालुक्यात स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद

शेकडो श्रीसदस्यांचा सहभाग; 62 टन कचर्‍याचे संकलन
| खरोशी | वार्ताहर |

महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा तर्फे आज पेण शहरात स्वछता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पेण तालुक्यांतील पेण, दादर, वरवणे, सापोली, हनुमान पाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ , आंबिवली, जिते, शिर्की, या 15 बैठकांतील श्री सदस्यांनी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविले.
श्री सदस्यांच्या या स्वच्छता अभियानात पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील,आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, आरोग्य कर्मचारी रमेश गुप्ता,गौतम मोरे, गणेश सारंगधर, नॅशनल हायवेचे उप मुख्यकार्यकारी अभियंता रविंद्र कदम, दुय्यम निबंधक सोनाली पिंपळे, पेण मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अतुल भगत, परिचारिका गीता भौड,अस्मिता भगत, वनरक्षक निलेश वारडे, सोनाली वाळके, प्रियंका सापते आदि सहभागी झाले होते. यामध्ये पेण शहरात सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये आदी ठिकाणाहून 40 टन ओला व 22 टन सुका असा 62 टन कचरा गोळा केला.गोळा करण्यात आलेला कचरा हा 11 ट्रॅक्टर, 01 डंपर, 15 पिकअप व्हॅन, 12 टेम्पो यांच्या साहाय्याने शहारा बाहेरील डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन जमा केला.या स्वछता अभियानात 1034 श्री सदस्य सहभागी झाले होते.

Exit mobile version