ब्रेक निकामी ट्रकची धडक

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात खोपोली बाहेर पडण्याच्या ठिकाणाजवळ सोमवारी सकाळी ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पुढील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात चालक व मदतनीस जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या केए 25 डी 6949 क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने टीएन 34 एझेड 9114 क्रमांकाच्या ट्रकला धडक दिली. धडकेनंतर चालक व मदतनीस केबिनमध्ये अडकले होते. बचाव पथकाने दोघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली.

Exit mobile version