| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरून आंबिवली गावाकडे आणि पुढे एकसल गावाकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण केला जात आहे. या रस्त्याच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू आहे. या आधी आंबिवली गावाकडे जाणारा रस्ता अरुंद होता. हा रस्ता रुंद व्हावा आणि या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी राजिप सदस्य व स्थानिकांकडून करण्यात आली होती. 2025 मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला रस्त्याचे जूने डांबरी पट्टे काढून त्यावर जेएसबी खडी टाकून मजबूत करण्यात आला. त्यानंतर आता रस्त्यावर काँक्रीटीकरणाचा थर टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकसल येथून हा रस्ता अंतिम टप्प्यात आणला जात आहे. सध्या आंबिवली रेल्वे फाटक ते राज्यमार्ग रस्त्याच्या भागात या रस्त्यावर काँक्रीटीकरण केले जात आहे. या रस्त्यामुळे गेली अनेक वर्षे खड्डेमय असलेला रस्ता काँक्रीटचा बनला आहे. या कामामुळे आंबिवली आणि एकसल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आंबिवली-एकसल रस्त्याचे काँक्रीटीकरण
