| महाड | प्रतिनिधी |
एका गृहिणीशी असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी 27 वर्षीय तरुणावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील काकरतळे भागातील शिवलिंग अपार्टमेंटमधील जिन्यात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलाही तालुक्यातील नांगलवाडी येथील रहिवासी असून, 18 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ती शिवलिंग अपार्टमेंटमधील सी विंगच्या जिन्यातून खाली उतरत असताना सौरभ विजय शिर्के (27, रा. काकर तळे, महाड) याने तिच्याशी असभ्य वर्तन करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अखेर या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर करत आहेत.