| खोपोली | वार्ताहर |
कंपनीतील मालाची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन खालापूर तालुक्यातील नारंगी येथील एचपी ग्रुप कंपनीचा व्यवस्थापक निलू दळवीला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निलू दळवी हा 2014 पासून कामावर कार्यरत असून त्यांच्यावर कारखानदार मालकाने वर्क मँनेजरची जबाबदार दिली होती. ही जबाबदारी सांभाळत असताना कारखानदार मालकाच्या विश्वासाला पात्र न राहता पैसा कमविण्याच्या उद्देशाने निलू दळवींनी एच.पी.ग्रुप कारखान्यातील साहित्य चोरी करणे, कंपनीमधील ठेकेदारांकडून तसेच विक्रेत्यांकडून टक्केवारी घेणे, याच कारखान्याच्या जोरावर सारखेच उत्पादन करून स्वतःचा दुसरा उदयोगधंदा चालवणे व त्याचबरोबर कारखान्यातील कामगार आपल्या उदयोगधंद्यात राबवून घेऊन लाखोंचा नफा मिळविणे असा धंदा सुरू केला. निलू दळवीच्या चोरीचे कारनामे उघडकीस आल्याने त्याला खालापूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.