| उरण | वार्ताहर |
पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही उरणमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असते. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रारी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. त्यामुळे बंदी काळात मासेमारी जोरात सुरू असते. हे टाळण्यासाठी मच्छीमार बोटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर नक्कीच त्याचा फायदा पावसाळी बंदी काळात होईल असा विश्वास पारंपारिक मच्छीमार बाधवांकडून व्यक्त केला जात आहे.
1 जून पासून माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारीस बंदी असते. ही बंदी फक्त दाखविण्यासाठीच असते, प्रत्यक्षात बंदीच्या काळातच मासेमारी जोरात सुरू असल्याचे चित्र उरण परिसरातील करंजा व मोरा बंदरात प्रामुख्याने पहावयास मिळते. पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारीस बंदी असते, परंतु ही बंदी फक्त कागदोपत्री असते हे टाळण्यासाठी मच्छीमार बोटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.