| चिरनेर | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘शासन आपल्या दारी सन 2023’ या कार्यक्रमांतर्गत उरण तालुका कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीचे नियोजन चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. तालुका कृषी विभागाच्या मार्फत कृषी सहाय्यक निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी खरीप पिकांच्या मार्गदर्शना संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील कोप्रोली, खोपटे, पानदिवे, सारडे, पिरकोन, पुनाडे तसेच अन्य ठिकाणी या बीज प्रक्रिया संदर्भात कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चिरनेर येथे आयोजित कार्यक्रमात, कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील, प्रगतशील आंबा बागायतदार शेतकरी बी.सी. म्हात्रे, माजी सरपंच संतोष चिर्लेकर, चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी आणि प्रात्यक्षिके करून दाखवली.