| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथे दाखल झालेल्या कुणबी जोडो अभियानाचे समाजाच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात म्हसळा तालुका संघटनात्मक दृष्टया नंबर एकचा तोही नियोजनात्मक दृष्टया सुद्धा तुलनेने वरचढच असल्याचे मत अभियानाचे नेते भूषण बरे, बबन उंडरे,अरविंद डाफळे, सदानंद काष्टे, अशोक वालम ,कृष्णा कोबनाक,महेश शिर्के, गणेश बोर्ले ,स्नेहा खापरे, मीना टिंगरे या प्रमुखांनी व्यक्त केले.
यावेळी झालेल्या सभेत माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,संजय खांबेटे आदींनी जातनिहाय जनगणना, कुळकायदा, बेदखल कुळाचे प्रश्न निकाली काढावे, दुषित पाणी, माणगाव येथे सर्व सुखसोयी युक्त रुगणालय,दिवा ते वीर लोकल रेल्वे सुरु करणे, बालवाडी ते पदवी परीक्षा मोफत आणि दर्जेदार शिक्षण, तालुक्यांत सांस्कृतिक केंद्र सुरु करणे, पट संखेचे निमीत्त करून प्राथमिक शाळा बंद न करणे असे अत्यंत ज्वलंत प्रश्नाना अनेक वक्त्यानी वाचा फोडली.