| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुंबई कस्टम झोन 3 च्या वतीने जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट तळोजा औद्योगिक वसाहतीत लावण्यात आली आहेत. जवळपास दीड हजार कोटी रुपये किंमत असलेले अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये या कंपनीच्या परिसराचा वापर करण्यात आला.
नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये. कोकेन, हेरॉईन, गांजा, एमडीएम ,मेथॅम्फेटामाइन अशा 350 किलो अंमली पदार्थांचा समावेश होता.तळोजा येथे उच्चस्तरीय औषधी विल्हेवाट समितीच्या देखरेखेखाली शास्त्रोक्त पद्धतीने ही विल्हेवाट लावण्यात आली.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत काही महिन्या पूर्वी देखील अशाच प्रकारे करोडो रुपये किमतीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आलेली होती.