अंगणवाडीत खुर्च्या वाटप

| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील पिगोंडे ता.रोहा ग्रामपंचायतीचे संतोष कोळी यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत-आंबेघर येथील अंगणवाड्यांना तसेच अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांना शुक्रवार (दि.6) विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कांचन माळी,सखाराम घासे, गीता पाटील,कुसुम बावकर, सुधाकर पारंगे, विजय अहिरे, कांचन पाटील, कांचन बावकर, तसेच अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.वेलशेत-आंबेबर येथील अंगणवाड्यांना ग्रामपंचायत फंडातून उपलब्ध करण्यात आलेल्या टेबल, खुर्ची, कपाट, शेगडी, भांडी इत्यादी उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याचबरोबर अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांना खुर्ची खेळणी वाटप करण्यात आले.

Exit mobile version