। अलिबाग । वार्ताहर ।
लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेंतर्गत आनंदो प्रकल्पामार्फत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज, बेलोशी या चार केंद्रामध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या-पुस्तके, दप्तर, कंपासपेटी, चित्रकला, वही आणि आलेख वही या साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वर्षासाठी संस्थेने बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी अशा चार विभागातून 290 मुलांची निवड केली असून त्या सर्वांना शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मिळून 532 हून अधिक लाभार्थ्यांसमवेत कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रकांत मोहिते उपसभापती पंचायत समिती मुरुड, नितीन पाटील मुख्याध्यापक को.ए.सो.ना.क.गायकर हायस्कूल वळके, बालाजी लाटे शिक्षक, प्रियांका राऊत, सिस्टर जुली चांदी मुख्याध्यापक माउंट कार्मेल हायस्कूल, रोशन मार्तीस, चेतन जावशेन सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली, मयुरेश गावंड, सिद्धार्थ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.