| मुंबई | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करु नये, याबाबत त्यांना वेळेवर सर्वकाही माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीत खरीप हंगाम आढावा बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं.
मुख्यमंत्री म्हणाले, येणारा खरीप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम जावा अशी इश्वराकडं प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक दरवर्षीप्रमाणं यावेळीही पार पडली. कृषी विभाग आणि सहकार विभागाचं यावेळी सादरीकरणं झालं. शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा हंगाम आहे. याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना सबंधित विभागांना दिल्या आहेत.
बियाणे-खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठेही तुटवडा भासणार नाही, त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बोगस बियाणं वितरीत करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जर अल-निनो प्रवाहामुळं पाऊस पुढे गेला तर त्यासंदर्भात मार्गर्शन कृषी विभाग आणि कृषी विभाग करतील. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतच्या उपययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.