द्रोणागिरी नोड सीआरझेडच्या विळख्यात

। उरण । वार्ताहर ।
सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती झाली आहे. परंतु सदर नोड हा समुद्र किनारी असल्याने त्याठिकाणी सीआरझेड कायदा लागू करण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. त्यामुळे सीआरझेड बाधीत जागेवर बांधकाम करण्यास बंदी असतानाही द्रोणागिरी नोडमध्ये बिल्डर लॉबी कडून इमारती उभ्या करण्याचा सपाटा लावला आहे. त्यावर भविष्यात कधी कारवाई होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बिल्डर जबाबदारीतून मोकळा श्‍वास घेईल.

शासनाने समुद्र किनार्‍या पासून काही अंतरावर सीआरझेडचा कायदा लागू केला आहे. त्या कायद्या अंतर्गत बांधकाम करण्यास परवानगी नसते. मात्र सिडकोने द्रोणागिरी नोड हे पूर्णपणे समुद्र किनारी वसविले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीआरझेड कायदा लागू करण्यात आल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. या ठिकाणी ही बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही बिल्डर लॉबी कडून इमारती उभ्या करून ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

द्रोणागिरी नोडमध्ये सीआरझेड कायदा लागू केल्याने बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहेत. बिल्डर लॉबिंच्या आमिषाला बळी पडण्याआधी आपण घेत असलेल्या जागेचा सर्व्हे नंबर नक्कीच तोच आहे का दुसरा नाही ना? इथपासून ते सर्व कागदपत्रे खरी व नियमाला धरून काम होते की नाही याची पूर्णपणे खातरजमा करूनच आपला मेहनतीचा पैसा खर्ची लावा. कारण सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणार्‍या बिल्डर लॉबिंच्या इमारतींवर भविष्यात कारवाई होणार असल्याचे संकेत अधिकृत सूत्राकडून समजते. यामुळे बिल्डर लॉबिंचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version