मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात

। पुणे । प्रतिनिधी ।

हि घटना पुणे येथे घडलेली आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. चालक दारूच्या नशेत होता. गाडीने याआधीच कुठेतरी अपघात केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. कारमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. शिवाय, त्याने कार कोठेतरी ठोकली असल्याचं दिसत आहे.

पुणे येथे दारू पिऊन कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडल्या त्यानंतर त्याची चौकशी करताना नशेत याआधीच त्याने कार कोठेतरी ठोकली असल्याचे दिसत आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे ए पी आय यांच्या सावधानतेमुळे पुढचे अपघात टळले असच म्हणावे लागेल. डेक्कन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालक शुभम गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. तेव्हा तो शुद्धीवर नव्हता त्याने पुढे गाडी चालवली असती तर आणखी अपघात झाले असते.

गाडीचा मूळ मालक कोण आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. या गाडीवर डॉक्टर असल्याचे बोधचिन्ह देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे ही गाडी कोणा डॉक्टरची आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही गाडी पुणे शहरातील कुठल्या भागातून डेक्कन परिसरात आली याचा देखील शोध पोलिसांकडून सुरू केला आहे. पोलसांचा अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version