विमानतळासाठी ई-शिवाई बससेवा सुरू

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवार दि.7 ऑक्टोबरपासून ई-शिवाई बससेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात दादर, बोरिवली आणि पुणे येथून विमानतळाला थेट जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे परिसरातील विमान प्रवाशांना विमानतळ गाठण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

नवी मुंबई विमानतळ ते दादर पूर्व या मार्गासाठी 170 रुपये, बोरिवलीसाठी 210 रुपये, तर पुणे स्वारगेटसाठी 450 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. दादरहून येणारी बस सायन आणि अटल सेतूमार्गे नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. बोरिवलीहून येणारी बस मुंबई विमानतळ टर्मिनल-1, वांद्रे आणि अटल सेतूमार्गे नवी मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहे. पुणे स्वारगेटहून सुरू होणाऱ्या सेवेमुळे पुणे तसेच परिसरातील प्रवाशांना थेट नवी मुंबई विमानतळ गाठणे शक्य होणार आहे. खासगी वाहन किंवा टॅक्सीच्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीचा हा पर्याय प्रवाशांसाठी सोयीचा ठरण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version