| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकिकरता चार ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात 7 तारखेला ही निवडणुक पार पडणार असल्याने मतदान करणाऱ्या फेरीवाल्यानी मतदान केंद्राची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या जाहिरातीतून करण्यात आले आहे. पनवेल पालिका नगर पथविक्रेता निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे.
प्रभाग निहाय होणार असलेल्या या निवडणुकी करता 7 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, पालिकेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेले जवळपास साडेतीन हजार फेरीवाले या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकी करता पालिकेच्या चार प्रभागात चार ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रभाग क्रमांक अ मधिल फेरीवाल्यांकरिता खारघर सेक्टर 12 मधील गोखले हायस्कुल मध्ये मतदान केंद्र असणार आहे. तर प्रभाग क्रमांक ब मधिल फेरीवाला मतदारानकरिता कळंबोली गाव येथे असलेल्या पालिकेच्या प्रभाग कार्यालया शेजारील काळभैरव मंगळ कार्यालय, प्रभाग क्रमांक क मध्ये कामोठे वसाहती मधिल सुषमा पाटील विद्यालयातील खोली क्रमांक 104 आणि प्रभाग क्रमांक ड मधिल फेरीवाला मतदारांना पालिकेच्या गुजराती माध्यमातील शाळेच्या खोली क्रमांक 9 मधिल मतदान केंद्रात मतदान करता येणार आहे.