अध्यक्षपदी अजित गुरव, तर उपाध्यक्षपदी अनघा चौलकर यांची निवड
मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महात्मा फुले नागरी सह. पतसंस्था मर्या. मुरुडची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली . 30 वर्षांची बिनविरोध निवडणूकीची पंरपरा कायम ठेवत कटुता व सत्ता संघर्ष टाळून परस्पर सहकार्याचा सदस्यांनी परिचय दिला .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अधीक्षक वाघमारे यांनी काम पाहिले.पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित जगन्नाथ गुरव तर उपाध्यक्ष पदी अनघा अनिल चौलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून आदेश दांडेकर , संदेश दांडेकर , सायली गुंजाळ , महेंद्र पाटील, अमित कवळे, राहुल वर्तक, उमेश अपराध, संदेश भगत यांचा समावेश आहे .
महात्मा फुले पतसंस्था ही मुरुड शहरात 3 दशके कार्यरत असून, 12 कोटी ठेवी असलेली अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची आगामी काळात नूतन वास्तु उभारून शाखा विस्तार सर्वांच्या सहकार्याने करणार असल्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष अजित गुरव यांनी व्यक्त केला.