। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील हेमनगरजवळ भरधाव कंटेनरने एका इलेक्ट्रिक पोलसह हायमॅक्सला ठोकर मारली. त्यामुळे सर्वत्र पडलेले सव्वा लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीक साहीत्य अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत पोयनाड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अज्ञात कंटेनर चालकाने करुन कंटनेर भरधाव वेगात चालवुन हेमनगर येथील इलेक्ट्रीक पोलाचे वायरीचे तसेच ग्रामपंचायत कुसुंबळे पथदिव्याचा हायमेक्स पोल अशा सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
सदर साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले आहे. सुमारे 1 लाख 29 हजार 629 रुपये किमतीचा माल चोरीस गेलेला आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 279, 336, 184, सार्व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम, 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास एम टी जाधव करीत आहेत.”