कैरे येथील क्रिस्टल कंपनीत मालाचा अपहार

। रसायनी । प्रतिनिधी ।

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील क्रिस्टल व्हीजन ए.आर. के.प्रा.लि. कंपनीत मालाचा अपहार करण्यात आल्याची घटना घडली. या कंपनीने जामनगर गुजरात येथील क्रिस्टल कंपनीत एमएच 48 सीबी 2200 या नंबरच्या गाडीमध्ये रोलर 40 नग – 2 लाख 50 हजार किंमतीचे तसेच चैनपुली ब्लॉक 19 नग – 1 लाख 30 हजार किंमतीचे कंपनीने जामनगर ते कैरे येथे पोहचण्यासाठी गाडीमध्ये माल भरुन आरोपी चालक नौशात अली रा.प्रतापघर उत्तरप्रदेश याचे ताब्यात विश्वासाने दिलेला असताना त्याने अप्रामाणिक हेतूने सदर मालाचा अपहार केला आहे. याबाबत प्रदीप जयसिंग सुरथ याने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी चालक नौशात विरुद्ध रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनि प्रमोद जाधव हे करीत आहेत.

Exit mobile version