| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात चार फाटा ते बिकानेर स्वीट या रस्त्यावर असलेली अतिक्रमण दूर करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दरम्यान, या अभियानाच्या निमित्ताने पालिकेकडून एका रस्त्यावरील अनेक वर्षापासूनची अतिक्रमणे दूर होण्यास मदत झाली आहे. अभियानासाठी शहरातील चार फाटा ते रेल्वे स्टेशन हा मार्ग कर्जत नगरपरिषद साठी देण्यात आला होता. या मार्गावरील चार फाटा ते बिकानेर स्वीट पर्यंतची अतिक्रमण पालिकेने काही महिन्यांपूर्वी काढली होती. त्यामुळे त्या रस्त्यावर आधी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेली झाडे बाजूला काढण्यात आली आणि पाण्याच्या सहायाने रस्ता स्वच्छ करण्यात आला. त्यावेळी पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे तसेच कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी, स्वच्छ्ता आणि आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, नगर अभियंता मनीष गायकवाड, बांधकाम विभाग प्रमुख रवी लाड, वीज विभाग प्रमुख सुनील लाड, कर विभाग प्रमुख ऋतुजा शिंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेले कर्जत चार फाटा ते रेल्वे स्टेशन या मार्गात बिकानेर स्वीट पासून स्टेशन रस्त्यावर अनेक वर्षे अतिक्रमणे उभी होती. सर्व अतिक्रमण आज पालिकेने जमीनदोस्त केली. त्यासाठी जेसीबी मशीन तसेच स्थानिक कामगार आणि दोन डंपर यांचा वापर त्यासाठी करण्यात आला.
रस्ता 40फुटाचा होणार
चार वर्षांपूर्वी कर्जत नगरपरिषद करून शहरातील भीसेगाव भागातील रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या रस्त्याचे काँक्रिट करण करण्यासाठी खोदण्यात आला होता. त्यानंतर त्या भागातील रस्त्याचे 40फूट रुंदीकरण असलेला बनविण्यासाठी रस्त्यात असलेली अतिक्रमणे दूर करणे महत्वाची बाब होती. मात्र ती अतिक्रमणे दूर करण्यास तब्बल चार वर्षे लागली असून आज रायगड जिल्हाधिकारी यांच्या अतिक्रमण दूर करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्ताने कर्जत स्टेशन ते भिसेगाव या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या रस्त्यावरील अतिक्रमणे पालिकेच्या पथकाने जेसीबी आणि कामगारांचे सहाय्याने दूर केली.